कळंब /प्रतिनीधी -
ताल्युक्यातील डिकसळ ग्रामस्थांनी वारंवार विनंती, अर्ज व निवेदन करूनही किंचितही घाम न फुटलेल्या महावितरण विरोधात सोमवारी दहा वाजता कळंब ढोकी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुमारे दीड तास जोरदार निदर्शने करत रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे तब्बल दिड किलोमीटर पर्यंत रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महावितरणचे सहायक अभियंता एन.के. सुतार यांनी लेखी हमी देत येणा-या आठ दिवसात समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
गेल्या अनेक महिन्यापासून मूळ डिकसळ गावात वीज पुरवठा खंडित होत आहे ,याबाबत कार्यालायाकडे सातत्याने ग्रामस्थांनी पाठपुरावा केला आहे. मात्र कार्यालयाकडून कुठलीच दखल घेतली गेली नाही. त्यातच खालिद शिकलकर व गणेश जाधव यांचा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे जीव गेला होता . त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी महावितरण विरोधात जोरदार रणशिंग फुंकत रास्ता रोको केला . आंदोलनाचा बडगा उचलल्या नंतर जागे झालेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सकारत्मक प्रतिसाद देत येणाऱ्या आठ दिवसात डिकसळ मूळ गावासाठी स्वतंत्र डीपी बसविणे, गावाच्या डिपीवरील शेतातील कनेक्शन तोडणे ,खाजगी कंपनीच्या टॉवरला गावच्या डिपीवरून वीज जोडणी न करता स्वतंत्र डीपी बसविणे . लोंबकळणा-या जीर्ण तारा तात्काळ नवीन बसविणे, गावासाठी पूर्णवेळ स्वतंत्र लाईनमन नेमणे .गावठाण मधील डीपी नवीन जागेत बसविणे आदी मागण्यांना बाबत लेखी देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले .
यावेळी उपसरपंच सचिन काळे , चेअरमन दत्तात्रय अंबिरकर, ग्रा.पं सदस्य सुजित लिमकर, जीव्हेश्वर कुचेकर ,गणेश त्रिवेदी , जनक अंबिरकर , हभप आण्णा महाराज बोधले, संतोष कदम , हनुमंत जाधव, इम्रान मुल्ला ,अनंत बोराडे ,युवराज धाकतोडे, हनुमंत जाधव, अभय जाधव , बालाजी गायकवाड, नानासाहेब धाकतोडे , सोमनाथ साबळे, ज्योतीनाना अंबिरकर, पंडित अंबिरकर, परमेश्वर जगताप,मधुकर काळे, अच्युत अंबिरकर, औदुंबर अंबिरकर, राजाभाऊ अंबिरकर , वैभव जाधव, राम त्रिवेदी, शंकर तनपुरे , ओंकार काळे , गोकुळ अंबिरकर, संजय काटे, बबलू त्रिवेदी, विशाल काळे, मदन खंदारे, सिद्धार्थ वाघमारे, दीपक वाघमारे, आण्णा शेळके, रामदास गायकवाड,प्रशांत माने, लक्ष्मण वनकलस के साथ ग्रामस्थ उपस्थित होते.