उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्हयात वाढती लोकसंख्या पाहता, राष्ट्रीयकृत बॅंके‘या शाखेची संख्या वाढविण्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत केली.
18 नोव्हेंबर रोजी सभागृह सुरू झाल्यानंतर वित्तरा’यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यां‘याकडे मागणी करताना खां.राजेनिंबाळकर यांनी सध्या‘या स्थितीत बॅंके‘या असलेल्या शाखावर कामाचा तान येत असून केंद्र सरकार‘या योजना, रा’यसरकार‘या योजना या बॅंकेद्वारे अंमलबजावणी होत असल्यामुळे राष्ट्रीयकृत बॅंके‘या शाखेवर यामुळे ताण येत आहे. ओमराजे यां‘या प्रश्राला उत्तर देत असताना रा’यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी 10 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात राष्ट्रीयकृत बॅंके‘या 25 टक्के शाखा उघडण्यास आरबीआयने परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे आरबीआय‘या संमतीशिवाय देशात कोठेही राष्ट्रीयकृत बॅंकेची शाखा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असेही सांगण्यात आले आहे. 
 
Top