कळंब /प्रतिनिधी-
कुणाचेही वाईट चिंतु नका, दररोज दहा मिनिटे भक्ती करा असे प्रतिपादन ज.न.म.प्रवचनकार सौ.संध्याताई कुलकर्णी यांनी केले आहे.
अनंत श्री विभुषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व नाणीजधाम पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराजांच्या क्रकृपाशिर्वादाने कळंब शहरात देवदिपावली च्या शुभमुहूर्तावर प्रवचन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात ज.न.म.प्रवचनकार सौ.संध्याताई कुलकर्णी म्हणाल्या की, आज समाजात अनेक लोक दारुने वाया गेले आहेत पण स्वामींच्या सहवासात आल्यानंतर हे लोक दारु सारख्या व्यसनातून मुक्त झाले.असे लाखो लोकांना जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांनी व्यसनातून मुक्त केले आहे. असे प्रतिपादन कुलकर्णी यांनी केले.
विश्वनाथ इंगळे जिल्हा निरीक्षक उस्मानाबाद व जिल्हा अध्यक्ष अरविंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याला जिल्हा आध्यात्मिक प्रमुख बाबा जाधवर, कळंब तालुका प्रसिद्धी प्रमुख अमर चोंदे, कळंब शहर संतसंगाचे जीवन चव्हाण, अशोक त्रिमुखे, राहूल पाटील, श्रीनिवास सुर्वे, रमेश शिंदे, अनिल हुलसुरकर, राहुल शिंदे व भक्तगण उपस्थित होते. शेवटी या सोहळ्याची महाप्रसादाने सांगता करण्यात आली. या सोहळ्याचे आयोजन कळंब शहर संतसंग क्र- 3 ,कसबा पेठ, कळंब येथिल भक्तांनी केले होते.