वाशी/प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य एड्स  नियंत्रण सोसायटी अंतर्गत जागतिक एड्स दिनानिमित्त कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी (राष्ट्रीय सेवा योजना विभाग) व ग्रामीण रुग्णालय वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालामध्ये एड्स जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी  प्रा.एम.डी उंदरे यांनी जागतिक एड्स दिनानिमित्त सर्वांना शपथ दिली. उपस्थित मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखून महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारा पासून रॅलीला सुरवात झाली.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शारदा मोळवणे, वाशी तालुका न्यायालयाचे न्यायाधीश  कोळेकर एस.एम, वाशी नगरपंचायतचे नगरध्यक्ष  नितीन चेडे, पंचायत समिती वाशीचे गटविकास अधिकारी  सुरेश मारकड, ग्रामीण रुग्णालय वाशीचे वैद्यकीय अधीक्षक  डॉ. शेळके एम यु, वाशी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार  हंकारे मॅडम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गोवर्धन महेंद्रकर, डॉ.प्रताप कस्तुरे, डॉ. अमर तानवडे, मकरंद शिंगणापूरे वाशी विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. शेरकर डी. व्ही, अॅड. शशिकांत कावळे, अॅड. सुजित ढेपे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.राजाभाऊ बनसोडे, प्रा.विश्वास चौधरी, प्रा.डॉ. बालाजी देवकते हे उपस्थित होते.यावेळी प्राचार्या डॉ.शारदा मोळवणे,ग्रामीण रुग्णालयामध्ये आय.टी.सी समुपदेशक श्री.परमेश्वर तुंदारे, संतोष बुधोडकर, ग्रामीण रुग्णालय वाशीच्या अधीक्षिका डॉ.मंजुषा शेळके, प्रा.शहाजी चेडे यांनी मार्गदर्शन केले. प्रा.विश्वास चौधरी व  राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी जिल्हा समन्वयक प्रा.शाम डोके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य  विभागाचे उत्तरेश्वर उबाळे, प्रवीण हांडीबाग, उमेश साळुंके, प्रा.डॉ.रविंद्र कठारे, प्रा.राम जाधव, प्रा.डॉ अनंत पाटील, प्रा.डॉ अनिल कट्टे, प्रा.महेंद्र चंदनशिवे, प्रा.केरबा जाधव, प्रा.डॉ अरुण गंभिरे,प्रा.पांडुरंग तांबारे, प्रा.कुंडलिक गुंड, प्रा.रवी चव्हाण, प्रा.राजेश उंदरे, प्रा.डॉ दैवशाला रसाळ, प्रा.शालन जगताप, प्रा.चेतना जगताप यांनी अथक परिश्रम घेतले.
 
Top