नळदुर्ग /प्रतिनिधी-
नळदुर्ग शहरातील महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हीस रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी दि. 30 नोव्हेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या नळदुर्ग बंदला व्यापारी व नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. शहरात 100 टक्के बंद पाळण्यात आला आहे. यावेळी अशोक भाउ जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय व्यापारी  व नागरीकांनी पोलिस ठाण्यात जावून सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे यांना तात्काळ सव्र्हीस रस्ता करण्यात यावे या मागणीचे निवेदन दिले. यावेळी शेकडो नागरीक उपस्थीत होते.
नळदुर्ग शहरातील महामार्गाच्या दोन्ही बाजूला गोलाई ते बसस्थानका पर्यंत सर्व्हीस रस्ता तयार करण्यातयावा ही शहरवाशीयांची मागणी आहे, नागरीकांची ही मागणी अतिशय योग्य आहे मात्र प्रशासन किंवा संबंधीत विभाग या मागणीकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी सर्व्हीस रस्ता नाही झाला तर हजारो नागरीक, जेष्ठ नागरीक, विदयार्थी व महाविदयालयीन विद्याथ्र्यांचा जीव धोक्यात येणार आहे. असे आसताना प्रशासन या ठिकाणी सव्र्हीस रस्ता तयार करण्यास टाळाटाळ का करीत आहे समजत नाही.
गेल्या पाच महीन्यापासून या ठिकाणी सव्र्हीस रस्ता तयार करण्यात यावा या मागणीसाठी अशोक भाउ जगदाळे  यांच्या  नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. दि. 19 जूलै 2019 रोजी नळदुर्ग बसस्थानका समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तर दि. 29 जूलै 2019 रोजी अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालया समोर सर्वपक्षीय एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्याच बरोबर 30 नोव्हेंबर 2029 रोजी नळदुर्ग शहर बंद करण्यात आले. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने करण्यात आली आसताना ही प्रशासनाला ही जाग येत नाही ही दुर्दैवाची बाब आहे.
दि. 30 नोव्हेंबर रोजी सव्र्हीस रस्ता तयार करण्यात यावा या मागणीसाठी नळदुर्ग शहर बंद पुकारण्यात आला होता. या बंदला व्यापारी व नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी अशोक भाउ जगदाळे  यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते, व्यापारी व नागरीकांनी चावडी चौकापासून पोलिस ठाण्यापर्यंत जावून सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे यांना निवेदन दिले. यावेळी अशोक जगदाळे, नगरसेवक नितीन कासार, महालिंग स्वामी, शहर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष  अशोकराव पुदाले, जिल्हा नियोजन समीतीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे, कमलाकर चव्हाण, शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष पूदाले, शहर भाजपा अध्यक्ष पदमाकर  घोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  शब्बीर कुरेशी, युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष नवल जाधव, सय्यद तन्वीरअली खतीब, अफसर जहागिरदार, ताजोददीन सय्यद, माजी नगरसेवक शरद बागल, किशोर नळदुर्गकर, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, अमर भाळे, तानाजी सावंत, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, सुधीर पाटील, गणेश मोरडे, सुनिल हजारी, सुनिल गव्हाणे, खंडेशाप्पा कोरे, शिवाजीराव वऱ्हाडे, राजकुमार खददे, राजकुमार पिचे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, सुधीर पोतदार, राजेंद्र काशीद, शाम कनकधर, सिध्देश्वर मुरमे, श्री पत्की साहेब यांच्यासह शेकडो नागरीक  उपस्थीत होते. दि. 9 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी सर्व्हीस रस्त्याचे काम सुरु नाही झाले तर दि. 9 डिसेंबर रोजी नळदुर्ग बसस्थानका समोर राष्ट्रीय महामार्गावर संपूर्ण दिवसभर अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी यांना ही देण्यात आले आहे.
 
Top