उस्मानाबाद/प्रतिनिधी-
भारतीय स्टेट बँकेतर्फे आयोजित चावडी मेळाव्यास महिला बचत गटाच्या महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, रवीकुमार वर्मा, संजय एडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमामध्ये एसबीआयतर्फे 265 महिला बचत गटांना छोट्या उद्योगासाठी 3 कोटी 3 लाख रुपयांचे कर्ज दिले. तसेच या चावडी मेळाव्यात ग्राहकांसाठी तत्काळ बचत खाते युनो रजिस्ट्रेशन याबद्दल माहिती देण्यात आली. त्याचबरोबर कार लोन, ट्रॅक्टर लोन, हाऊसिंग लोन, व्यावसायिक लोन, शैक्षणिक कर्ज याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. महिला बचत गटांतर्फे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रमास ग्राहकांनी प्रतिसाद दिला. या कार्यक्रमातून ग्राहकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व बँकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपले योगदान दिले.

 
Top