उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 सेंट्रिंगच्या कामासाठी माहेरवरून दोन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करून तिहेरी तलाक दिल्याप्रकरणी सासरच्या 12 जणांविरोधात गुन्हा नोंद झाला.
या प्रकरणी दिलदार मुबारक शेख(पती), रोशनबी मुबारक शेख, जरीना तुराब शेख, तुराब वजीर शेख (रा. सक्करवाडी ता. परंडा), मुमताज शौकत पठाण, शौकत रहेमान पठाण (रा. पाटोदा, ता. जामखेड), यास्मीन असलम शेख, असलम शेख (दोघे रा. राजुरी, ता. जामखेड), अहेमद निजाम शेख, शमशाद अहेमद शेख, अफसाना निजाम शेख, दिनयात करीम शेख (चौघे रा. सांगवी, ता.आष्टा) यांच्याविरोधात परंडा पोलिस ठाण्यात तिहेरी तलाक, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
 
Top