उस्मानाबाद/प्रतिनिधी-
अवजड वाहनांसाठीचा नूतनीकरणाचा प्रस्ताव दाखल करूनही तो वेळेत नूतनीकरण करून न देता सेवेत त्रुटी ठेवल्याबद्दल ग्राहक तक्रार निवारण मंचाने उस्मानाबादच्या उपप्रादेशिक परिवहन अधिका-यास अर्जदारास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी 10 हजार रुपयांची रक्कम एक महिन्यात देण्याचे आदेश दिले.
कळंब तालुक्यातील येरमाळा येथील संजय रघुनाथ बारकुल हे पुणे येथे एका रोडलाइन्स कंपनीत अवजड वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अवजड वाहन परवान्याची मुदत संपल्याने तो परवाना नूतनीकरणासाठी त्यांनी दि.26 डिसेंबर 2017 रोजी आवश्यक त्या कागदपत्रांसह तसेच शुल्क भरना करून उपप्रादेशिक कार्यालय उस्मानाबाद येथे सादर केला होता. यानंतर कार्यालयाच्या वतीने त्यांना नूतनीकरण झालेला परवाना पोस्टाने घरी येईल असे सांगितले. परंतु, अनेक दिवस उलटले तरी परवाना मिळत नसल्याने बारकुल यांनी आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधल्यावर त्यांना उलटसुलट उत्तरे देऊन टोलवाटोलवी करण्यात आली. यामुळे बारकुल यांनी दि.19 मार्च 2018 रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर दि.11 मे 2018 रोजी त्यांना नूतनीकरण केलेले परवाना मिळाला. परंतु, या दरम्यान परवाना नसल्याने बारकुल यांना काम मिळाले नाही त्यामुळे तीन महिन्याचे वेतन म्हणून 75 हजार तसेच त्रासापोटी 50 हजार अशी सव्वा लाखाची नुकसान भरपाईसाठी बारकुल यांनी एम. सी. देशमुख यांच्या मार्फत ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केली.
यावर सुनावणी होऊन समोर आलेली बाजू व अॅड. देशमुख यांनी मांडलेली बाजू याचा विचार करून मंचाने तक्रारदाराचा अर्ज अंशता मंजूर करत अर्जदारास आदेशापासून एक महिन्यात त्रासापोटी 10 हजार रुपये उप प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी देण्याचे आदेश दिले.