लोहारा/प्रतिनिधी-
लहान मुलांचे शोषण होत असल्यास चाईल्ड -लाईनच्या 1098 या नंबरवर  संपर्क करावा, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. वसुधा दिग्गज दापके - देशमुख यांनी केले.
चाईल्ड - लाईन व सह्याद्री फाऊंडेशन्स उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने चाईल्ड - लाईन से दोस्ती या उपक्रमाअंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील जि.प.आंतरराष्ट्रीय माध्यमिक शाळेमध्ये नकोसा स्पर्श (चांगला व वाईट स्पर्श) याविषयी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच संजय (नाना) सूर्यवंशी होते. तर प्रमुख म्हणुन बाल संरक्षण अधिकारी श्रीमती वैशाली पाटील, विधी व पर्यवेक्षक अधिकारी  अँड. जयश्री भाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भालचंद्र मोहिते, टी.एन.वनकळस, श्रीमती सलगर, घायाळ, यंदे, चाईल्ड- लाईन चे समन्वयक ज्ञानेश्वर गिरी, टीम मेंबर विकास चव्हाण, राजेंद्र कापसे, सह्याद्री फाऊंडेशन्सचे गजानन पाटील, आर.जी. मुख्याध्यापक सुरवसे, आदी उपस्थिती होती.
यावेळी डॉ.वसुधा दिग्गज दापके - देशमुख पुढे बोलताना म्हणाल्या कि, घटनेने बालकांना हक्क दिले आहेत. परंतु या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्व समाजाने एक होऊन काम करायचे आहे. प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलला तरी आपण समाजात मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करू शकतो, व त्यांचे बालपण अबाधित राहू शकतो, असे सांगीतले. यावेळी बाल संरक्षण अधिकारी श्रीमती वैशाली पाटील, विधी व पर्यवेक्षक  अधिकारी अँड.जयश्री भाले यांनी यावेळी बालकांच्या सुरक्षेविषयी विचार व्यक्त केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात उपसरपंच संजय (नाना) सूर्यवंशी यांनी शिक्षकांनी बालकांची मानसिक स्थिती ओळखून त्यांच्याशी संवाद साधण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, गावातील महिला, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक आर.जी.सुरवसे व सूत्रसंचालन विद्याथ्र्यांनी विद्या डोलारे यांनी केले तर आभार श्रीमती एस.एस. दारफळकर यांनी मानले.
 
Top