नळदुर्ग /प्रतिनिधी-
 रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले का ८ सप्टेबर रोजी बिदर येथे जाताना नळदुर्ग येथे बसस्थानका समोर राष्ट्रीय महामार्गावर शहर भाजपाचे अध्यक्ष पदमाकर घोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, डॉ. दिपक जगदाळे, उत्तम बनजगोळे, भाजपाचे शहरचिटणीस सागर हजारी, भैरवनाथ कानडे, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे, मारुती खारवे, श्री स्वामी यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.  त्यानंतर  शहरातील व्यासनगर येथील जयंहिंद तरुण गणेश मंडळास भेट देवून खासदार संभाजीराजे भोसले यांनी श्री गणेशाची आरती केली.यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल मेंडके यांनी खासदार  छत्रपती संभाजीराजे यांचा सत्कार केला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

 
Top