कळंब/प्रतिनिधी- अपघाताला नियंत्रण देणारे रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील सर्वच पक्षाचे पदाधिकारी यांनी रस्त्यावर उतरून गांधीगिरी करत खड्डयात झाडे लावून आंदोलन केले.
शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडलेले आहेत, तसेच शहरातील बहुतांश पुलाचे स्लॅप पडल्याने खड्डे निर्माण झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.शहरातील पुलांची दुरुस्ती करावी शक्य त्या ठिकाणी नवीन पुले बांधण्यात यावी यासंबधी अनेक वेळा निवेदने देवून ही सत्ताधारी मंडळी व प्रशासनाला जाग येत नाही. शहरातील या खड्डयांमुळे वाहनांच्या नुकसानी बरोबरच अपघात ही होत आहे. रात्री चालणाऱ्या आबालवृद्धांला खड्डयात अनेक वेळा पडल्याने त्यांना दु:खापत ही झालेली आहे. सत्ताधारी मंडळींचे शहराच्या विकासाकडे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी,व्यापारी यांनी खड्डयात झाडे लावून गांधीगिरी केली. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा गटनेते शिवाजी (आप्पा) कापसे , भाजपाचे शहराध्यक्ष भैय्या बावीकर , शे.का.प. चे जिल्हा सहचिटणीस भाई बाळासाहेब धस, नगरसेवक सतीश टोणगे, प्रतिष्ठित व्यापारी करसन पटेल, भाजपाचे माणिक बोंदर , दिनकर काळे, आदी नागरिक व्यापारी उपस्थित होते.