परंडा/ प्रतिनिधी :- येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने पक्षाची कृत्रिम घरटी या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे तर प्रमुख पाहुणे म्हणून वैराग येथील सोमेश्वर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे निखिल अडसुळे उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.हरिश्चंद्र गायकवाड प्रा.डॉ.अरुण खर्डे प्रा.डॉ.रंदील गजेंद्र प्रा.डॉ.प्रकाश सरवदे प्रा.डॉ.अतुल हुंबे प्रा.डॉ.सचिन चव्हाण प्रा.विद्याधर नलवडे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे प्रा.बी.वाय.माने प्रा.डॉ.संभाजी गाते उपस्थित होते.या कार्यशाळेचे आयोजन प्राणीशास्त्र विभाग व सोमेश्वर बहुउद्देशीय सामाजिक संस्था वैराग आणि ॲनिमल फ्रेंड बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी रा.गे.शिंदे गुरुजी यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त डॉ.राधाकृष्ण सर्वपल्ली महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी महाविद्यालयातील कला वाणिज्य व विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुणे निखिल अडसुळे यांनी पर्यावरण संवर्धन, पक्षांचे घरटी ॲमेझॉन रेन फॉरेस्ट या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी शिक्षक दिनानिमित्त महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रा.गे.शिंदे गुरुजी यांच्या कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप करताना त्या म्हणाल्या की शिक्षक व विद्यार्थी यांचे घनिष्ठ संबंध असले पाहिजे तरच विद्यार्थी  घडविण्यामध्ये शिक्षकांचे योगदान मार्गी लागेल शिक्षकांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर आपल्याविद्यार्थ्यांना सामाजिक धडे देऊन त्यांना संस्कारित केले पाहिजे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहे त्यांना घडवण्यामध्ये शिक्षकांचा खूप मोठा रोल आहे तेव्हा सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न कसे करता येईल यासाठी प्रयत्न करावेत यावेळी निखिल अडसुळे यांनी पावर पॉइंट वारे पर्यावरण संवर्धन ॲमेझॉन फॉरेस्ट पक्ष्यांची विविध भरती यासंदर्भात प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी वरिष्ठ महाविद्यालयातील कला वाणिज्य व विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.डॉ शहाजी चंदनशिवे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करून कार्यक्रमाचे आभार मानले. शेवटी निखिल अडसूळे यांनी पर्यावरण संवर्धनावर कविता सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.
 
Top