परंडा/प्रतिनिधी-
तालुक्यातील श्री क्षेत्र सोनारी येथे श्री काळ भैरवनाथाचे पुरातन मंदिर असून  जवळपास निम्मा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधील लोकांचे कुलदैवत आहे. लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी गाडीतून खाली उतरताच नजर पडेल तिकडे माकडच माकड निदर्शनास येतात.  या कुलदैवत भैरवनाथाच्या
सोनारी  या गावात मंदिर ठिकाणी दीड हजारच्या आसपास माकडांची संख्या आढळून येते परंतु  या माकडांच्या खाद्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोण करते की नाही ? हा प्रश्न मनाला पडतो परंतु या सर्व भैरवनाथाच्या माकडांची खाण्याची व पाण्याची व्यवस्था सोनारी येथील युवक सचिन सोनारीकर हे गेल्या तीन साडे तीन वर्षा पासून नित्यनियमाने दररोज करत आहेत.
  येथील माकडांना खाण्यासाठी शेंगदाणे, फुटाणे, गहू,  तांदूळ, ज्वारी, बाजरी, बटाटे, टमाटे, बिस्किटे, केळी इ. प्रकारचे खाद्य दिले जाते परंतु परंडा तालुक्यात सध्या भयावह दुष्काळी परिस्थिती असताना या मुक्या प्राण्यांची गैरसोय होताना पाहायला मिळत होती.  परंतु हे माकडे खादय अन्ना पासून उपासी राहू नये यासाठी सचिन सोनारीकर हे आपल्या ओळखीच्या लोकांकडून,  भैरवनाथाच्या भक्त लोकांकडून किंवा अधिकारी, राजकारणी यांच्याकडे मदत मागून या माकडांची खाण्या पिण्याची सोय व नित्यनियमाने देखभाल करताना सध्या दिसत आहेत.  यासाठी त्यांना बरेच ठिकाणी फिरावे लागत असून अन्नधान्य मिळवण्यासाठी गयावया करावी लागत आहे तसेच पिण्याच्या पाण्याची सोय ही नसल्याने मंदिराशेजारील  हातपंपा मधून पंप मारून माकडांची पाण्याची सोय केली जात आहे.  यावेळी मोठमोठे पाण्याचे टफ पाण्याने भरुन ठेवले जातात त्यामधून माकडे पाणी पितात. सचिन सोनारीकर हा तरुण दुष्काळी परिस्थितीत या मुक्या वन्य प्राण्यांची ,माकडांची खाण्या पिण्याची सोय करण्यासाठी धडपत आहे.  
 
Top