वाशी /प्रतिनिधी- तालुक्यातील पारगाव येथे कॉ.आण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षा निमित्त महामानव,गडकोट किल्ले सन्मान परिषदेचे आयोजन  ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे राज्य अध्यक्ष कॉ.पंकज चव्हाण केले होते.परिषदेला गावातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.या परिषदेला वीर भगतसिंग अकॅडमी ईट. चे संस्थापक प्रताप देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
या परिषदेत आशा कार्यकर्ती म्हणून काम करणा-या महिलांना त्यांच्या ड्रेस कोट असणा-या साड्यांचे वाटप करण्यात आले.तर बँड व्यवसायात अल्पकाळावधीत वेगळा ठसा उमवठवणारे सुजित औताने यांचा ही सत्कार करण्यात आला. परिषदेत प्रताप देशमुख यांचे व्याख्यान झाले. यावेळी विविध विषयांवर प्रकाश टाकण्याचे काम केले. या कार्यक्रला पारगाव येथील मुक्तार शेख, कुणाल चव्हाण, धनंजय गोंदवले, दयानंद गायकवाड, सारंग मोटे, डी.बी.मोटे, दीपक आखाडे, राहुल डोके, संभाजी चव्हाण, शरद गायकवाड, सिकंदर शेख, आयुब पठाण, चांद ताबोळी, अशोक माने, मयूर पवार, विशाल माने, संतोष चौधरी,आकाश शिंदे, महेश गोंदवले, रोहन चव्हाण यांच्यासह पारगांव येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वाशी पोलीस स्टेशनचे कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते.

 
Top