उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मुलींनी प्रत्येक क्षेत्रात स्वत:ची क्षमता सिध्द करावी. बालविवाह होणे अतिशय दुर्दैवी प्रथा असून बालविवाह रोखणे, ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. विशेषत: ग्रामीण भागात याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. मुली उच्चशिक्षित व्हाव्यात, समाजात बालविवाहाला थारा देऊ नये , मुलींचा जन्माचा दर वाढला पाहिजे, असे विचार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आज येथे व्यक्त केले.
उमरगा शहरात बालविवाह एक अभिशाप या लघुचित्रपटाचे प्रदर्शन व चित्रपटातील कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम थिएटर येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे अध्यक्षस्थानी होते तर पंचायत समितीचे सभापती अॅड.राजासाहेब पाटील,नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, तहसिलदार संजय पवार, उमरगा पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, प्राचार्य डॉ.घनश्याम जाधव, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड,अंनिसचे जिल्हा राज्य सरचिटणीस प्रा. किरण सगर, तालुका विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. दिलीप सगर, अॅड. प्रदीप पणुरे, अॅड. प्रवीण तोतला, आरपीआयचे तालुका अध्यक्ष सुभाष सोनकांबळे, महिला बालविकास अधिकारी सुरेखा जाधव, उद्योजिका ज्योती सपाटे आदींची उपस्थिती होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांनी समाजातील अनिष्ठ रुढीला बाजूला सारून मुलींनी स्वत:मधील आत्मविश्वास जागृत करण्याची गरज असल्याचे सांगितले.
पंचायत समितीचे सभापती राजेसाहेब पाटील,किरण सगर, सचिन बिद्री, किशोरी साठे आदी मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी उपस्थित महिला व मुली तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत लोकराज्य या शासनाच्या मुखपत्राचे सामूहिक वाचन केले. श्री.छत्रपती महाविद्यालय, उमरगा या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एच.जाधव आणि आदर्श महाविद्यालय, उमरगा या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप गरूड यांनी लोकराज्य महाविद्यालय म्हणून प्रस्ताव जिल्हा माहिती अधिकारी श्री. सानप यांच्याकडे सुपूर्द केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने धनुर्विदयेत राष्ट्रीय पारितोषिक मिळविणारी कु.आर्या सुरेंद्रवाले आणि भारूड लोककलेव्दारे राज्य व देशपातळीवर उस्मानाबाद जिल्हयाचे नाव उज्वल करणारी कु.कृष्णाई उळेकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.याप्रसंगी मोबाईलच्या माध्यमातून कृष्णाई उळेकर हिने बालविवाह प्रतिबंध या विषयावरील सुंदरसे भारुड सादर करून उपस्थित महिला व मुलींचे प्रबोधन केले. कृष्णाईच्या वतीने तिचे वडील श्री.प्रभाकर उळेकर या कार्यक्रमास उपस्थित होते.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत यांनी प्रास्ताविक केले.अमोल पाटील, संजय कोथळीकर, प्रा. युसुफ मुल्ला, प्रभाकर मजगे, विजय जाधव, शैलेश महामुनी, पद्माकर मोरे, प्रा. विनोद देवरकर, रविंद्र पोतदार, स्वाती मायाचारी, कैलास आष्टे, सारंग देवा, इमाद सय्यद आदींनी यासाठी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रवीण स्वामी, पुष्पलता पांढरे यांनी केले. श्री. सचिन बिद्री यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास उमरगा शहरातील शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षिका, अंगणवाडी कार्यकत्र्या, आशा कार्यकत्र्या मोठया संख्येने उपस्थित होत्या.