परंडा / प्रतिनिधी  - पावसाळा संपत आला असला तरी आद्यापपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने शहरास पाणी पुरवठा करणारे सर्वच धरण प्रकल्प कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती.उजनी धरणातून सिना नदीत आलेले पाणी सीना जॅकवेल बंधारा मध्ये पाणी परंडा नगर परिषदे कडून उचलून घेण्याच्या कामाला सुरुवात झाली असुन याची प्रत्यक्ष पाहणी करताना माजी आमदार ज्ञानेश्र्वर पाटील,नगराध्यक्ष जकिर भाई सौदागर, नगरसेवक राहुल बनसोडे,संजय घाडगे, जनार्दन मेहेर,तनवीर मुजावर, मारुती अलबते, नगर परिषद कर्मचारी  जलील मुजावर, तातू साडेकर, सोमनाथ कसबे, संतोष कांबळे आदी उपस्थित होते.
धरणातील पाणीसाठा संपूर्ण संपल्याने परंडा शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.बोगद्याद्वारे सिना नदीत पाणी साचले असून हे पाणी सिना जॅकवेल बंधाऱ्या मध्ये बोटी ने पाइपलाइन व यंत्राने घेतले तर परंडा शहराचा पाणी प्रश्न सुटेल अशी सूचना माजी आमदार ज्ञानेश्र्वर पाटील यांनी नगराध्यक्ष जाकिर भाई सौदागर यांना केली.
यावरून नगराध्यक्ष सौदागर यांनी पालिकेत तातडीने नगरसेवक आणि पाणी पुरवठा कर्मचारी यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करून आज हे प्रत्यक्ष पाणी उचलून घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.बंधा-यात पाणी जमा होत असल्याने परंडा शहरातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

 
Top