उमरगा/प्रतिनिधी-डॉ. बी. पी. गायकवाड यांनी सोमवारी दि.16 रोजी मुंबई येथे शिवसेनाभवनात पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. शिवसेनेचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या सोबत लढतीत त्यांचा पराभव झाला होता. गायकवाड यांच्या रुपाने लोहारा तालुक्यातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्याने तालुक्यातील नागरिकातुन त्यांचे स्वागत केले जात आहे.
उमरगा तालुक्यातील कॉग्रेक पक्षाचे वतीने  2009 साली विधानसभा निवडणुकीचे उमेदवार डॉ. बी. पी. गायकवाड यांनी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षात प्रवेश करून उमरगा लोहारा विधानसभा निवडणुकीत इच्छुक असून त्यानीं पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली व करुन मुलाखत दिली आहे. डॉ. बी. पी. गायकवाड हे लातूर आणि उस्मानाबाद येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सहा वर्षे व उपसंचालक आरोग्य सेवा लातूर येथे तसेच सहसंचालक आरोग्यसेवा पुणे येथे त्यांनी काम केले आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना  60 हजार 474 हजार मते मिळाली होती. चौगुले यांनी त्यांचा 10332 मतांनी त्यांचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारापासून दुर राहिल्याने सावंत गटाने बी. पी. गायकवाड यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचा घाट घातल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 
Top