लोहारा/प्रतिनिधी-बालकांनी 'नकोसा स्पर्श' ओळखावा, असे प्रतिपादन सह्याद्री फाऊंडेशन्सच्या सचिव तथा प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.वसुधा दिग्गज दापके देशमुख यांनी केले. सह्याद्री फाउंडेशन उस्मानाबाद यांच्या वतीने उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील श्री हनुमंतराव पाटील विद्यालय येथे 'नकोसा स्पर्श' याविषयी शाळेतील मुलामुलींना मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, 95 % लैंगिक शोषणही जवळचे नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तीकडून होते. त्यामुळे पालक, शिक्षक व मुलांमध्ये विश्वासाचे नाते व संवाद आवश्यक असल्याचे सांगीतले. व तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल उपयोग हा शैक्षणिक माहिती घेण्यासाठी करावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवजीवन शिक्षण संस्थेचे सचिव व्ही.एस.पाटील हे होते. तर प्रमुख म्हणून मुख्याध्यापक जी.एम पाटील, श्रीमती सी.व्ही पाटील,अदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह्याद्री फाऊंडेशन्सचे पदाधिकारी राजेंद्र कापसे, बालाजी कानवटे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, अदिंनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मुख्याध्यापक डी.एच.पाटील व सूत्रसंचालन जी.बी.ढोणे यांनी केले. तर आभार श्रीमती अश्विनी पवार यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थींनी, शिक्षक, कर्मचारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.