वाशी/प्रतिनिधी-वाशी आज मराठवाडा मुक्ति संग्रामाच्या ध्वजारोहनांनंतर तहसील कार्यालय वाशी येथून पिकावरील कीड क्वसर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपस्याप) सन 2019-20 अंतर्गत प्रचार प्रसार मोहिमेंतर्गत तहसिलदार संदीप राजपुरे व तालुका कृषि अधिकारी श्री संतोष कोयले यांनी हिरवा झेंडा दाखवून वाशी येथुन शुभारंभ केला
वाशी तालुक्यामध्ये पिकावरील कीड सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपस्याप) प्रचार प्रसार मोहिमे अंतर्गत मका पिकावरील लष्करी आळी,सोयाबीन पिकावरील पाने खणारी आळी,शेंगा खाणारी आळी,चक्रीभुंगा,कापसावरील गुलाबी बबोण्डआळी, त्यासोबतच सर्व पिकावरील किडिविषयी त्याचप्रमाणे किटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी व किटकनाशकेफवारणीमुळे विषबाधा झाल्यावर तात्काळ करावयाच्या उपाययोजणेविषयी तालुक्यातील सर्व गांवांत पुढील आठ दिवसांत चित्ररथाद्वारे, ऑडिओक्लिपद्वारे, मार्गदर्शनाद्वारे सखोल माहिती देण्यात येणार आहे. आज चित्र दिंडीरथाच्या वाशी गावातून शुभारंभ करताना तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या गावात चित्रदिंडीरथ आल्यावर उपस्थित राहून माहितीचा उपभोग घेण्याविषयी तहसिलदार श्री संदीप राजपुरे व तालुका कृषि अधिकारी श्री संतोष कोयले यांनीआवाहन केले यावेळी वाशीचे तहसिलदार श्री संदीप राजपुरे,तालुका कृषि अधिकारी श्री संतोष कोयले, मंडळ कृषि अधिकारी श्री नितिन भांडवले, शुक्राचार्य भोसले, नायब तहसिलदार श्री भालचंद्र यादव, श्रीमती पाटील, श्रीमती हंकारे, कृषि पर्यवेक्षक श्री रामदास शिंदे, श्री महादेव भुतेकर, कृषिसहाय्यक श्री दिनेश लोंढे,श्री  नवनाथ गिरी तहसील व कृषिविभागातील कर्मचा-यांसह जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक व  शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
 
Top