वाशी/प्रतिनिधी-
 महिला बचत गटाने महिलाचे जनजीवन सुधारावा यासाठी गटाने बँकेच्या दारात  पैशासाठी न जाता.या मतदार संघातील सर्व बचत गटांना तानाजी सावंत प्रतिष्ठान, यांच्या वतीने प्रत्येकी 11000 रुपयांचा चेक देत आहोत .व त्या पैशावर महिलांनी स्वावलंबी बनावे असे उद्गार तानाजी सावंत यांनी काढले.
वाशी येथे शिवसेना संकल्प मेळावा मंगळवार 17 सप्टेंबर रोजी  छत्रपती शिवाजी बाल-संस्कार मैदानावर दुपारी 1वाजता पार पडला यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री दिलीप सोपल ,माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील , वाशीचे शिवसेना युवा नेते प्रशांत चेडे, धनंजय सावंत, अण्णासाहेब देशमुख ,सुभाष सिद्धीवाल, गौतम लटके, आदी उपस्थित होते.
  पुढे बोलताना मंत्री सावंत म्हणाले की, महिला बचत गटाने छोटे-छोटे उद्योग निर्माण करून त्यामध्ये जे साहित्य निर्माण होईल, ते साहित्य तुमच्या जवळ पडून न राहू देता मी सर्व खरेदी करीन .मग त्या साहित्यामध्ये मला  नफा व तोटा याची अपेक्षा न बाळगता सर्व साहित्य मी स्वत: खरेदी करून महिला स्वावलंबन बनवरणार आहे.तसेच परिसराचा व जिल्ह्याचा विकास करायचा आहे .त्यासाठी मी प्रशांत चेडे यांना काँग्रेस मधून शिवसेनेत आणले आहे. तसेच मी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर काही दिवसातच एकूण 660 बंधाऱ्यांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आपल्या परिसरात शेतीसाठी या बंधा-याचा पाण्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकरी सुधारेल व आपल्या परिसराचा विकास होईल तसेच ,कृष्णा खो-याचे पाणी आपल्या मतदारसंघात परडा परिसरात आणले आहे ते पाणी भूम-परंडा-वाशी पर्यंत पोहोचल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असे सावंत यांनी यावेळी आश्वासन दिले. तसेच जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, प्रशांत चेडे ,दिग्विजय चेडे, दिलीप सोपल ,ज्ञानेश्वर पाटील, प्रसाद जोशी नगरसेवक वाशी, यांनी आपले विचार व्यक्त केले. या मेळाव्यासाठी वाशी शहरातून पालकमंत्री ,खासदार व प्रमुख पाहुण्यांची वाजत-गाजत रॅली काढून मेळाव्याला सुरुवात केली.
या मेळाव्यासाठी दत्ता साळुंखे, मेघराज पाटील, चेतन बोराडे, वाशीचे नगराध्यक्ष _ नितीन चेडे, उपनगराध्यक्ष - नागनाथ नाईकवाडी, शिवसेना वाशी तालुका प्रमूख अॅड सत्यवान गपाट शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर शिवहार स्वामी, बिभीषन खामकर, विकास मोळवणे, सतीश शेरकर आदी उपस्थित होते.या मेळाव्यात भूम-परंडा-वाशी तालुक्यातील अनेक पक्षातील लोकांनी तानाजी सावंत यांच्या हस्ते शिवसेनेत यावेळी प्रवेश केला. वाशी तालुक्यातील महिला हजारोच्या संख्येने व तालुक्यातील तसेच भूम परंडा तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जोशी यांनी केले.
 
Top