तेर/प्रतिनीधी-उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ग्रामसेवा संघाच्या वतीने तेरमध्ये विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचरा कुंडीमुळे अस्ताव्यस्त होत असलेला कचरा "कचरा कुंडीत" साठू लागला आहे.
विविध विधायक कार्य करण्याच्या उद्देशाने "ग्रामसेवा संघाची "स्थापना करून विविध विधायक कार्यास युवकानी १७ सप्टेंबर २०१८ पासून प्रारंभ केला.दर रविवारी तीन तास तेरमधील सार्वजनिक ठीकाणे,चौक, बस स्थानक परीसर, मंदीरे,नदी घाट,ग्रामीण रूग्नालय परीसर स्वच्छ करण्यात आला.त्यामुळे स्वच्छता हीच सेवा मानुन स्वच्छ तेर सुंदर तेर साठी ग्रामसेवा संघाचे सर्व सदस्य परीश्रम घेत आहेत.सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने मिळालेल्या विविध झाडांची नरसिंह मंदीर परीसरात १ हजार झाडांची लागवड करण्यात येऊन जोपासना करण्यात येत आहे.तसेच २ हजार झाडांचे विद्यार्थी,विद्यार्थीनीना वाटप करण्यात आले. भाविकासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून ग्रामसेवा संघाच्या वतीने श्री.संत गोरोबा काका यांच्या वार्षिक याञेनिमीत्त पाणपोईची सोय करण्यात आली होती..स्वच्छ तेर सुंदर तेर संकल्पनेतून ग्रामसेवा संघाच्या वतीने संग्रहालयापासून जून्या बसस्थानकापर्यंत १० (दहा) लोंखंडी कचरा कुंडया तयार करून विविध ठीकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत.त्यामुळे विविध ठीकाणी अस्ताव्यस्त पडणारा कचरा नागरीक कचरा कुंडीत टाकत असल्याने हा परीसर कांही अंशी स्वच्छ दिसू लागला आहे.ग्रामसेवा संघाच्या सामाजिक कार्यामुळे प्रेरीत होऊन तेर येथील संजय कडप्पा इंगळे यानी १० (दहा)हजार रूपये निधी तेर ग्रामसेवा संघास दिला असून या रक्कमेतून २० (विस)कचरा कुंडया करण्यात येत असून लवकरच तेरमध्ये अत्यावश्यक ठीकाणी ठेवण्यात येणार आहेत.ग्रामसेवा संघ "स्वच्छ तेर सुंदर तेर" ही संकल्पना राबवत असल्याने ग्रामस्थामध्ये समाधान व्यक्त करण्यात आहे.