उस्मानाबाद/प्रतिनिधी -
जिल्ह्यातील तीन ठिकाणी छापा मारून कारई करत जुगाराच्या साहित्यासह रोख २३,३८० रुपये जप्त करण्यात आले. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमरगा येथे मच्छिंद्र कोगनुर, शरणाप्पा रंजिरे, बशीर शेख, अमित सगर (सर्व रा. उमरगा) हे कल्याण मटका जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम ७,०४० रुपयांच्या मालासह उपविभागीय पोलिस अधिकारी उमरगा यांच्या पथकास आढळून आले. यावरून त्यांच्याविरुध्द पोलिस ठाणे उमरगा येथे शनिवारी (दि.७) गुन्हा दाखल झाला. तसेच उस्मानाबाद येथील देशपांडे स्टॅन्ड येथे राजू पारधी (रा. झोरेगल्ली, उस्मानाबाद), शेख मोहसीन फहीम (रा. राजोरी), किशोर लगदिवे (रा. शेकापूर, ता. उस्मानाबाद) हे कल्याण मटका जुगार खेळत असताना जुगाराचे साहित्य व रोख २,२७० रुपये उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आढळून आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पोलिस ठाणे उस्मानाबाद (श.) येथे शनिवारी (दि.७) गुन्हा दाखल झाला. तसेच तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील बसवेश्वर चौकात दर्शन शेटगार, वैजीनाथ कोरे, गुरुनाथ शेट्टी, सुनील कसेकर (सर्व रा.नळदुर्ग) हे तिरट जुगार खेळत असतांना जुगाराच्या साहित्यासह रोख १४,०७० रुपयाचा माल नळदुर्ग पोलिसांच्या पथकास आढळून आले. यावरुन त्यांच्याविरुध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात रविवारी (दि.८) गुन्हा दाखल झाला. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जुगार खेळणाऱ्यांविरुध्द पोलिस प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात करवारई करण्यात येत अाहे. |
|