परंडा / प्रतिनिधी- शासनाकडून गड-किल्लयावर उभारण्यात येणा-या हॉटेल रिसॉर्ट व लग्नाकरिता गड- किल्ले भाडेत्तवावर देण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ व अवैध धंद्याच्या ठिकाणी छत्रपति महाराजांची मूर्ती ठेवण्याला बंदी करण्याची मागणी करीत शहरातील शेकडो शिवप्रेमीनी परंडा बंदची हाक दिली होती. शिवप्रेमीच्या बंदच्या हाकेला शहरातील व्यापा-यांनी प्रतिसाद दिल्याने शहरातील व्यापारपेठ सोमवारी पुर्णपणे बंद होती.
येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 7 वाजल्यापासूनच शिवप्रेमींची गर्दी वाढत चालली होती. शिवप्रेमींनी शहातून दुचाकीवरुन रॅली काढत युवकांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. शहरातील व्यापा-यांनी बंदला प्रतिसाद देत बाजारपेठा बंद ठेवल्या होत्या. दुपारनंतर शिवप्रेमीकडून तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांना निवेदन देऊन
महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्लयावर उभारण्यात येणा-या हॉटेल रिसॉर्ट व लग्नसमारंभ समारंभासाठी सदरील गड व किल्ले भाडेत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. सदरील निर्णयामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या निर्णयाचा निषेध व्यक्त करून, परंडा शहरातील अवैध धंदे व धाब्यामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमा मूर्ती ठेवण्यात येत असल्याने स्वराज्याची संकल्पना निर्माण करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची व मूर्तीची एकप्रकारे विटंबना केली जात आहे. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना तीव्र झाल्या आहेत. तरी शासनाने गडकिल्ल्याना भाडेतत्वार देण्याचा निर्णय मागे द्यावा, तसेच परंडा पोलिस प्रशानकडून अवैध धंद्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा व मूर्ती ठेवण्यात बंदी घालण्याची मागणी शिवप्रेमी कडून करण्यात आली आहे.
आंदोलनामध्ये राजेश काळे, सुरज केदारे, अभिलाष सूर्यवंशी, धीरज ठाकूर, राम निकम, सचिन कडबणे, उमेश घाडगे, राम गटकुळ, शुभम पाटील, गजानन गायकवाड, तेजस गायकवाड, कानिफनाथ पाटील, परमेश्वर नेटके, महेश फळे, गणेश बारस्कर, गजानन जाधव, कृष्णा जाधव, समाधान वडतिले, शुभम ठाकूर, महादेव गटकुळ, दत्ता गटकुळ, बाबासाहेब वडतिले, महेश कुदळे, नाना बोराडे, नितीन जाधव, प्रमोद गटकुळ, कानिफनाथ कुदळे नागेश कुदळे यांच्यासह शेकडो शिवप्रेमींनी सहभागी झाले होते.