कळंब / प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाळकृष्ण व्यंकटराव तांबारे  यांना शैक्षणिक, शिक्षक संघटन व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मराठा सेवा संघाच्या वतीने "शिक्षक भूषण "पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दि.1 सप्टेंबर रोजी शिवानंद हाँल उस्मानाबाद येथे धनेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डाँ.प्रतापसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मराठा सेवा संघाच्या 29 व्या वर्धापन दिन सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य परिषदेचे अध्यक्ष नितीन तावडे, प्रगतशिल शेतकरी राजेंद्र मुंदडा,अँड. श्रीमती मनिषा राखुंडे व मान्यवर उपस्थित होते.
 
Top