तेर /प्रतिनिधी-आपल्या खिलाडू वृत्तीच्या जोरावर तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेसह आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करुन जिल्ह्यांसह गावं शाळा आदिचे नाव क्रीडा क्षेत्रात उंचावणा-या आजी माजी खेळाडूंचा राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त तेर ता. उस्मानाबाद येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील खेळाडूंचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी विद्यालयातील खेळाडूंनी क्रीडा दिनानिमित्त कोल्हापूर ,सातारा ,सांगली येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यांची मदत केली .प्रारंभी कार्यक्रमांचे अध्यक्ष एम .एल. कांबळे , प्रमुख पाहुणे कलीम काझी , ह .भ .प .रघुनंदन महाराज पुजारी , राष्ट्रीय खेळाडू पृथ्वीराज साळुंके , कल्पना घंटे , डी .डी .राऊत   यांच्या हस्ते हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून तालुका जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय स्पर्धेसह आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलीम काझी , पृथ्वीराज साळुंके ,  कल्पना घंटे , राधा गोरे , गायत्री पंडित , पुजा पिंपळे , व्यंकटेश थोडसरे , वाकुरे श्रद्धा , गीता गोरे ,  वैष्णवी माने , रोहित एकीले , सुजाता परगे , भक्ते जयश्री , रितेश भिसे , साक्षी ढगे ,  राजनंदिनी कानाडे , प्रगती पाडूळे, प्रणिता जाधवर , प्रतिक्षा पिंपळे , दिव्या खरात , वैष्णवी इंगळे , निकीता घोगरे , अपेक्षा माळी , अजय गायके, चैतन्य भिसे ,  लोमटे सौरभ , श्रावण आंधळे , रोहन कांबळे , श्रीमंत टेळे , ओम शिंदे , यशराज भोरे , विराज जाधवर , आदित्य काळे , जान्हवी नाईकवाडी , रुपनावर प्रांजली , अंकिता पाडूळे , श्रद्धा देशमुख , सायली झाडे , शिवनेरी स्वामी , रोहन घोडके , वैभवी राऊत , नंदिनी चौहान , ओमकार नाईकवाडी , अभय चौगुले , रोहन कोळी , मते पल्लवी , प्रतिक्षा केसकर , साई पांचाळ , आदि खेळाडूंसह क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. बी .वाघीरे यांनी केले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 
Top