परंडा/प्रतिनिधी -
शहरातील कुर्डवाडी मार्गावरील अजिंक्यराजे पेट्रोलपंपावर 5 जणांनी धाडसी दरोडा टाकून 1 लाख 82 हजारांची रोकड लंपास केली. यावेळी एका सेल्समेनच्या डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने डोक्यावर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार सोमवारी ( दि.9 ) पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडला. याबाबत माहिती मिळताच परंडा पोलिसांनी अवघ्या आठ तासात तीन संशयीतानंा ताब्यात घेतले आहे. त्यांना मंगळवारी पंरडा न्यायालयात हजर केले असता. १६ सप्टेंबरपर्यंत ७ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी अन्य दोघंना पोलिसांनी अटक केली आहे.
अजिंक्यराजे पेट्रोल पंपावर सोमवारी पहाटे 3 च्या सुमारास 5 दरोडेखोर दुचाकीवरून आले. पेट्रोल टाकण्याचा बहाणा करून कर्मचारी व वाचमन यांना कोयत्याचा धाक दाखवत व्यवस्थापक कक्षात प्रवेश केला. यावेळी झोपलेल्या सेल्समेन प्रशांत नरसाळे यास गल्ल्याची चावी दे म्हणून धमकाऊन उठवले. मात्र चावी देण्यास नकार देताच दरोडेखोराने डोळ्यात चटणी टाकूण हातातील धारदार कोयता डोक्यात मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर चावी घेवून काऊंटरच्या गल्ल्याचे लॉक उघडून आतील 1 लाख 92 हजार 570 रुपये व मोबाईल घेवून पसार झाले. या घटनेची माहिती व्यवस्थापक श्रीराम खरात यांनी पोलिसानां दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर गतीने तपास करून अवघ्या 8 तासात तिघा संशयितांना ताब्यात घेतले होते.
 
Top