तुळजापूर /प्रतिनिधी -तालुक्यातील अनेक पक्षांच्या मंडळींनी ,सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळजापूरचे भाजपा युवा नेते रोहन देशमुख यांच्या मार्फत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी तुळजापूर तालुक्यातील बोरगाव येथील लक्ष्मण पाटील (उपसरपंच), संतोष पाटील (ग्रामपंचायत सदस्य), औदुंबर पाटील (ग्रामपंचायत सदस्य), मोहन पाटील (ग्रामपंचायत सदस्य), विश्वनाथ पाटील (ग्रामपंचायत सदस्य), सुरेश पाटील, अर्जुन पाटील, दादाद पाटील, सतीश पाटील, रत्नदीप पाटील (तंटामुक्त अध्यक्ष), जळकोट येथील अर्जुन आबा कदम पाटील (उपसरपंच), लहू कदम-पाटील यांचे सहकारी राहुल श्रीधर पाटील या पदाधिका-यांनी कार्यकत्र्यासोबत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी तुळजापूर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अर्जुन कदम, अजय ढोणे आदीची उपस्थिती होती.

 
Top