उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्हयात अनंत चतुदर्शशीची जय्यत पुर्वतयारी पुर्ण झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने लेझीम, झांज, ढोलसह अन्य कलापथकांचा सराव पुर्ण झाला आहे. पोलीस प्रशासनकडूनही गणेश मिरवणुकीत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी बंदाबस्त तैनात करण्यात आला आहे. उस्मानाबाद येथे मिरवणुक मार्गावर ५० सीसीटीव्ही बसविण्याचे कामही पुर्ण झाले आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे गैरप्रकार थेट सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैंद होणार आहेत, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.
उस्मानाबाद शहर व परिसरातील घरगुती व छोट्या गणेश मुर्ती विसर्जनाकरीता उस्मानाबाद नगर पालिकेच्या वतीने शहरातील जिजामाता उद्यानात एक छोटा कृत्रिम तलाव बनविण्याचे काम पुर्ण झाले आहे. घरगुती-लहान गणेश मुर्तींचे विसर्जन या तलावात करावे, असे आवाहजन पालिकेने केले आहे.
पालिकेचा उपक्रम
उस्मानाबाद नगर पालिके ने यावर्षीही पर्यावरणाचे रक्षण व प्रदूषण टाळण्यासाठी सार्वजनिक मंडळासाठी गणेश मुर्ती विसर्जन न करता आगामी गणेशोत्सवास मुर्ती ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. मंडळांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले आहे.