परांडा/प्रतिनिधी- शिंदे गुरुजी हे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून मुलांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन व करण्याचे काम करत होते.त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष कमी देऊन बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची दारे खुली व्हावीत म्हणून न्यू कॉलेज या नावाने परंडा येथे महाविद्यालय उघडले सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी देशाच्या प्रगतीसाठी मुलींनी शिकावे मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी त्या महाविद्यालयांमध्ये एक वस्तीग्रह असावे असे स्वप्न पाहिले होते.ते स्वप्न सत्यात उतरविण्याचे काम संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी करून दाखविले आहे असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.दीपा सावळे यांनी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रा.गे.शिंदे गुरुजी यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयांमध्ये जयंती उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये अध्यक्षीय समारोप करताना वरील उदगार काढले. यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ.शहाजी चंदनशिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.एस.के गायकवाड उपस्थित होते यावेळी प्रा. संभाजी धनवे, प्रा.बि.डी.माने ,प्रा.एस.के.गायकवाड यांनी आपली मनोगते व्यक्त केले या कार्यक्रमासाठी कनिष्ठ वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन संस्कृतीक विभाग प्रमुख प्रा.डॉक्टर शहाजी चंदनशिवे यांनी केले होते.या कार्यक्रमासाठी कला वाणिज्य व विज्ञान विभागातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी करून आभारही मानले प्रा. एस के गायकवाड म्हणाले की शिंदे गुरुजी हे त्यागी व्यक्तिमत्व असलेले एक आदर्श असे शिक्षक होते. त्यांनी त्यांच्या पेन्शन मधून अनेक वेळा महाविद्यालय बंद पडू नये म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांना त्याच पैशांमधून थोडे थोडे पैसे देऊन त्यांच्या कुटुंबाची काळजी करत ते खूप साधे पणाने राहत होते पण त्यांचे विचार मात्र खूप मोठे होते.त्यांचा कल सामाजिक क्षेत्राकडे जास्त होता त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती जबरदस्त होती केवळ चाळीस मुलावर सुरू झालेले हे महाविद्यालय आज वटवृक्ष मध्ये रूपांतर झालेले आपल्याला दिसून येत आहे.सर्व शाखांचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे हे त्यांचे स्वप्न आज सत्यामध्ये उतरलेले आहे गुरुजी यांनी अंधश्रद्धेला कधीच थारा दिला नाही ते या देशातील महापुरुषांच्या विचाराने प्रेरित झाले होते.यावेळी प्राध्यापकाने आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूआले होते.सर्व सभागृह भावनांशी झाले होते.प्राचार्या डॉ.दीपा सावळे म्हणाल्या कि या महाविद्यालयाची सद्यस्थिती पाहता हे महाविद्यालय एका विशिष्ट दिशेने प्रगतीपथावर गरुड झेप घेत असलेले दिसून येत आहे.सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत असताना व कॉपीमुक्त महाविद्यालय चालू असताना सर्वांचे सहकार्य लाभत आहे असे मत प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी व्यक्त केले.वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे शिंदे गुरुजी होते - प्राचार्या डॉ.दीपा सावळे
परांडा/प्रतिनिधी- शिंदे गुरुजी हे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून मुलांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन व करण्याचे काम करत होते.त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष कमी देऊन बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची दारे खुली व्हावीत म्हणून न्यू कॉलेज या नावाने परंडा येथे महाविद्यालय उघडले सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी देशाच्या प्रगतीसाठी मुलींनी शिकावे मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी त्या महाविद्यालयांमध्ये एक वस्तीग्रह असावे असे स्वप्न पाहिले होते.ते स्वप्न सत्यात उतरविण्याचे काम संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी करून दाखविले आहे असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.दीपा सावळे यांनी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रा.गे.शिंदे गुरुजी यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयांमध्ये जयंती उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये अध्यक्षीय समारोप करताना वरील उदगार काढले. यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ.शहाजी चंदनशिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.एस.के गायकवाड उपस्थित होते यावेळी प्रा. संभाजी धनवे, प्रा.बि.डी.माने ,प्रा.एस.के.गायकवाड यांनी आपली मनोगते व्यक्त केले या कार्यक्रमासाठी कनिष्ठ वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन संस्कृतीक विभाग प्रमुख प्रा.डॉक्टर शहाजी चंदनशिवे यांनी केले होते.या कार्यक्रमासाठी कला वाणिज्य व विज्ञान विभागातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी करून आभारही मानले प्रा. एस के गायकवाड म्हणाले की शिंदे गुरुजी हे त्यागी व्यक्तिमत्व असलेले एक आदर्श असे शिक्षक होते. त्यांनी त्यांच्या पेन्शन मधून अनेक वेळा महाविद्यालय बंद पडू नये म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांना त्याच पैशांमधून थोडे थोडे पैसे देऊन त्यांच्या कुटुंबाची काळजी करत ते खूप साधे पणाने राहत होते पण त्यांचे विचार मात्र खूप मोठे होते.त्यांचा कल सामाजिक क्षेत्राकडे जास्त होता त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती जबरदस्त होती केवळ चाळीस मुलावर सुरू झालेले हे महाविद्यालय आज वटवृक्ष मध्ये रूपांतर झालेले आपल्याला दिसून येत आहे.सर्व शाखांचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे हे त्यांचे स्वप्न आज सत्यामध्ये उतरलेले आहे गुरुजी यांनी अंधश्रद्धेला कधीच थारा दिला नाही ते या देशातील महापुरुषांच्या विचाराने प्रेरित झाले होते.यावेळी प्राध्यापकाने आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूआले होते.सर्व सभागृह भावनांशी झाले होते.प्राचार्या डॉ.दीपा सावळे म्हणाल्या कि या महाविद्यालयाची सद्यस्थिती पाहता हे महाविद्यालय एका विशिष्ट दिशेने प्रगतीपथावर गरुड झेप घेत असलेले दिसून येत आहे.सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत असताना व कॉपीमुक्त महाविद्यालय चालू असताना सर्वांचे सहकार्य लाभत आहे असे मत प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी व्यक्त केले.