उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांची बदली नंदुरबार येथे झाली आहे.त्यांच्याजागी आता लातूर येथील उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांची बदली झाली आहे.शासनाच्या महसूल व वन विभागाने बदल्यासंदर्भातील आदेश शुक्रवारी (दि.6) जारी केले आहेत.
चेतन गिरासे यांनी उस्मानाबाद महसूल उपविभागाचे अधिकारी म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यकाळात अवैध गौण खनिज संदर्भात कारवाया झाल्या तसेच तुळजापुरातही चांगले बदल दिसले. काही काळ त्यांच्याविरूध्द तुळजापुरात रोष ही निर्माण झाला होता. त्यांची बदली आता नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे उपविभागीय अधिकारी पदावर झाली असून, लातूर येथील उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांची बदली झाली आहे. 
 
Top