बेंबळी/ प्रतिनिधी-
बेंबळी न्यूज ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषातील विजेत्यांना उत्साहपूर्ण वातावरणात पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
मल्लिकार्जुन मंदिर येथे ग्रामसेवा ग्रुपच्या गणेश मूर्ती संकलन केंद्रामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेंबळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम जाधव होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती बालाजी गावडे, माजी उपसरपंच बाळासाहेब माने, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिनेश हेड्डा, खरेदी-विक्री संघाचे संचालक ज्ञानोबा निकम, युवा व्यापारी सचिन हेड्डा, उद्योजक चंदन भडंगे आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले. यामध्ये डॉ. अमोल गावडे व ॲड. उपेंद्र कटके यांच्यावतीने ठेवण्यात आलेले हेल्मेट हे पहिले बक्षीस प्रथम क्रमांक पटकावलेले कृष्णप्रसाद गावडे व त्यांचे पिताश्री नागेश गावडे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. भाजप नेते संतोष आगलावे यांच्या वतीने ठेवण्यात आलेले दुसरे ब्ल्युट्रूथचे पारितोषिक रणजीत बरडे यांना देण्यात आले. अनंत बोंदर यांच्यावतीने ठेवण्यात आलेले हातातील घड्याळाचे तिसरे पारितोषिक रंजीत निकम यांनी पटकावले. त्यांच्यातर्फे हे पारितोषिक खरेदी विक्री संघाचे संचालक तथा त्यांचे पिताश्री ज्ञानोबा निकम यांनी स्वीकारले. यासोबतच व्यापारी सचिन हेड्डा यांच्यावतीने उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून दहा हेडफोन ठेवण्यात आले होते. हे 10 हेडफोन सुरेश वाघमोडे, संतोष आगलावे, अनिल दाणे, प्रसाद चौधरी, सिद्धेश्वर वाघमारे, शंकर नळेगावकर सोमनाथ वाघमारे, श्याम पाटील, प्रथमेश पाटील, संजय वेदपाठक यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अमोल गावडे, सूत्रसंचालन उपेंद्र कटके यांनी केले. आभार धनंजय भोसले यांनी मानले.
कार्यक्रमासाठी ऍड अमोल गाडे, मनोज पाटील, चंद्रकांत खापरे , सचिन कोरे, रामभाऊ मोटे, नितीन खापरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
