उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरातील समतानगर येथील सह्याद्री कॉर्नरजवळील बाकले कलेक्शनला शनिवारी (दि.14) पहाटे आग लागून दुकानातील 24 लाख रुपयांचे कपडे जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच 10 मिनिटात अग्निशमन दल आणि प्रभारी तहसीलदार आर. आय. केलुरकर घटनास्थळी दाखल झाले होते. यामुळे दुसऱ्या दुकानाला आग लागण्यापूर्वीच विझविण्यात आली.
उस्मानाबाद शहरातील समतानगर येथे संजय बाकले यांचे बाकले कलेक्शन कापड दुकान आहे. मात्र, शनिवारी (दि.14) पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने दुकानाला आग लागली होती. दुकानाच्या शटरमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या काही नागरिकांनी अग्निशमन दलास फोन करून आगीची माहिती दिली. त्यानंतर काही मिनिटातच संजय बाकले मॉर्निंग वॉकसाठी दुकानापासून जाताना शटरमधून धूर निघत असल्याचे दिसले. त्यानंतर तातडीने घरी जाऊन किल्ली आणून दुकानाचे शटर शटर उघडले असता आगीचा लोळ बाहेर आला. त्यानंतर काही मिनिटात अग्निशमन दल दाखल झाले. तसेच तहसीलदार केलुरकर यांनाही घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ घटनाथळी दाखल झाले होते. मात्र, आगीने मोठे रूप धारन केल्यामुळे पूर्ण दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दुकानाचे सर्व शटर तोडून आग विझवण्यात आली. तसेच दुपारी तहसील विभागाच्या वतीने मंडळाधिकारी व तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला असून 24 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे. 

 
Top