उस्मानाबाद/प्रतिनिधी-जिल्हात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शरद पवार यांच्यावर व त्यांच्या धोरणावर पुर्ण विश्वास असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच जिल्हात वाटचाल केली जाईल, लवकरच शरद पवार यांच्या उपस्थिती मध्ये जिल्हयात महामेळाव्याचे आयोजन करणार आहोत. त्यामुळे राणापाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून गेल्याने जिल्हयातील राष्ट्रवादी कॉंग्रेसवर कांही ही परिणाम झाला नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, आ. विक्रम काळे, सतिश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवार दि.२ सप्टेंबर रोजी दुपारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदे मध्ये आ. विक्रम काळे, आ. सतिश चव्हाण यांनी राणापाटलावर टिका करत गेल्या ४० वर्षांत तुमच्याकडच मंत्री पद होते. विकासासाठी पक्षांतर केल्याचे का सांगत आहेत. जीवनराव गोरे यांनी उस्मानाबाद जिल्हयात रेल्वे आणण्यात शरद पवारांचा मोठा वाटा आहे. त्याप्रमाणे १९९३ साली भूंकपग्रस्तांसाठी अथक परिश्रम करून अनेक गांवाचे पुर्नवसन केले. उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस चा काल ही बालेकिल्ला होता आणि भविष्यात ही राहणार, असे सांगत उस्मानाबाद व कलंब या दोन तालुक्यातच फक्त थोडीफार नुकसान झाल्याचे सांगितले. आ. सतिश चव्हाण यांनी राणापाटील कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांचा निवडणुकीत पराभव निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस आ. राहुल मोटे, उस्मानाबाद जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी नगराध्यक्ष संपत डोके, अमित शिंदे, जिल्हा परिषदचे माजी सभापती दादासाहेब पाटील सोनारीकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रवीण यादव आदींची उपस्थिती होती.