उस्मानाबाद /प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेस दिनांक 18 सप्टेंबर 2019 रोजी पासून येथील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे सुरूवात झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. पद्मसिंह पाटील पथसंस्थेचे चेअरमन श्री विक्रम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संजय देशमुख, गुणवंत काळे, मोहन पाटील यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका संयोजक बिभीषण पाटील यांनी केले. तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी तालुक्यातील 14,17,19 वर्ष वयोगटातील मुले - मुलीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत तालुक्यातील जवळपास 825 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणून योगेश थोरबोले,अजिंक्य वराळे, योगेश उपळकर,औदुंबर जगताप, विवेक कापसे,कुलदीप सावंत ,पाटील ऋषिकेश, राम भुतेकर, अश्विन पवार, शैलेश पाचभाई, अविनाश थोरबोले यांनी काम पाहिले.