तुळजापूर/प्रतिनिधी-
 तालुक्यातील ईटकळ येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला.दोन घरे फोडऩ पाच तोळे सोन्याचे, 24 तोळे चांदीचे दागिने व पाच हजार रूपये रोख असा एकूण सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केला. 18 सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील ईटकळ येथील नागनाथ मारुती लकडे यांचे घर बंद होते. हीच संधी साधत अज्ञातांनी दरवाजावरील कुलूप तोडून घराची झाडाझडती घेतली. यानंतर चोरट्यांनी इम्रान काशीम शेख यांच्या घराकडे मोर्चा वळविला. घर फोडून आत प्रवेश मिळविला. यानंतर अज्ञाताने कपाट व पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवलेली सोन्याची बोरमाळ, कर्णफुले. सोनसाखळी, अंगठी व चांदीचे पैंजण असा ऐवज लंपास केला. यानंतर चोरटे दुसऱ्या गल्लीमध्ये गेले. शिकुर मुजावर यांच्या घर बांधकामाचे साहित्य ठेवलेल्या गोडावूनचे कुलूप तोडून हात साफ केला. अप्पू महाबोले यांच्या हायवेलगत आसलेल्या चहाच्या टपरीचे कुलूप तोडून काही ऐवज चोरून नेला. दरम्यान, चोरटे दृष्टीस पडताच गावातीलच सौदागर साखरे यांनी त्यांचा पाठलाग सुरु केला असता एकाने साखरे यांच्या दिशेने दगड भिरकावला. हा दगड मांडीला लागल्यामुळे ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. उपरोक्त घटनेत जवळपास दीड लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
घटनेची माहिती मिळताच नळदुग पोलिस ठाण्याचे सपोनि लहाने, जमादार राजाभाऊ सातपुते, एस.बी. मोरे, मन्मथ पवार, अश्विन कांबळे, इटकळचे पोलीस पाटील विनोद  सलगरे यांनी रात्री घटनास्थळाचा भेट दिली. सकाळी उस्मानाबाद येथ्ील श्वासन पथकास प्राचरण करण्यात आले. मात्र हे पथक सोलापूर-हैद्रराबाद हायवेवरच घुटमळले. त्यामुळे चोरट्यांचा माग मिळू शकला नाही. सदरील प्रकरणी इम्रान शेख यांनी नळदुर्ग पुलिस ठाण््यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्न्हा नोंद करण्यता आला.
 
Top