
लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा तालुक्यातील माकणी येथील श्री संत मारुती महाराज देवस्थानास जमिन व तिर्थक्षेत्र स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी व भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करुन प्रयत्न करीन, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार यांनी केले.
लोहारा तालुक्यातील माकणी येथे श्री संत शिरोमणी मारुती महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार यांच्या हस्ते दि.10 सप्टेंबर 2019 रोजी सांयकाळी आरती पुजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ह.भ.प.महेश महाराज, छत्रपती संभाजीराजे यांचे खासगी सचिव योगेश केदार, भाजपा मिडिया जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, सह्याद्रि फाऊंडेशन्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिग्गज दापके देशमुख, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर मुळे, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, अशोक दुबे, विनोद मुसांडे, अनिल ओवांडकर, प्रताप राजपुत, यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.