उस्मानाबाद/प्रतिनिधी-उस्मानाबादमध्ये विविध गणेश मंडळांनी पारंपारिक पध्दतीने उत्कृष्टपणे कला सादर करून गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत केला असून, पत्रकार संघाने शिस्तबध्द तसेच कला सादरीकरणाची सुरू केलेली परंपरा स्तुत्य आहे, असे प्रतिपादन माजीमंत्री आमदार मधूकर चव्हाण यांनी केले.
उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने मंगळवारी (दि.10) गणेश मंडळांसाठी उत्कृष्ट सादरीकरण स्पर्धा आणि 2018 च्या शिस्तबध्द गणेश विसर्जन मिरवणुकीचा पारितोषिक वितरण समारंभ लेडीज क्लबच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार चव्हाण बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन,भाजप नेते सुधीर पाटील, उपनगराध्यक्ष सूरज साळुंके, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप,पोलीस उपाधीक्षक मोतीचंद राठोड, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कस्तुरे,माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक-नारीकर, कमलाकर कुलकर्णी, प्रगती पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, हर्षल डंबळ,रोटरीचे सचिव सूरज कदम, सरचिटणीस भीमाशंकर वाघमारे, उपाध्यक्ष देवीदास पाठक, महेश पोतदार आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविकपर मनोगत व आभार पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांनी तर सूत्रसंचालन पत्रकार संघाचे मार्गदर्शक रवींद्र केसकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य यांनी पुढाकार घेतला.
-
उत्कृष्ट सादरीकरणाने प्रेक्षक भारावले,
पत्रकार संघाने यंदा मुख्य मिरवणूक मार्गावर निर्माण होत असलेल्या अडचणी ध्यानात घेवून लेडीज क्लबच्या प्रांगणात कला सादरीकरण स्पर्धेचे आयोजन केले होते. यात विविध गणेश मंडळांनी अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण केले.या सादरीकरणात क्लिन समता, ग्रीन समता गणेश मंडळाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. द्वितीय साई परिवार गणेश मंडळ, तृतीय श्रीकृष्ण गणेश मंडळ तर उत्तेजनार्थ पारितोषिक देवून साईराज गणेश मंडळ आणि राजे समर्थ गणेश मंडळास गौरविण्यात आले.हा सादरीकरणाचा सोहळा पाहण्यासाठी मैदानावर मोठी गर्दी झाली होती.पडत्या पावसात सुरू असलेला हा अनुपम सोहळा पाहून प्रेक्षक भारावून गेले.
-
शिवाजी गणेश मंडळाला प्रथम पारितोषिक
गतवर्षी घेण्यात आलेल्या उत्कृष्ट देखावा स्पर्धेत शिवाजी गणेश मंडळ प्रथम, बाल हनुमान गणेश मंडळ द्वितीय, श्रीकृष्ण गणेश मंडळ तृतीय तर माऊली गणेश मंडळास उत्तेजनार्थ पारितोषिक देवून अनुक्रमे 10 हजार, सात हजार, पाच हजार आणि तीन हजार रूपये रोख रकमेसह सन्मानीत करण्यात आले. गतवर्षी घेण्यात आलेल्या उत्कृष्ट मिरवणूक स्पर्धेत विजय चौक तरूण गणेश मंडळाने अव्वल स्थान पटकावित पहिल्या पारितोषिकावर आपले नाव कोरले. दुस-या क्रक्रमांकाचे पारितोषिक राजे संभाजी गणेश मंडळ, तृतीय सम्राट गणेश मंडळ तर उत्तेजनार्थ भागीरथी परिवार गणेश मंडळास सन्मानीत करण्यात आले. या मंडळांचा अनुक्रमे 10 हजार, सात हजार, पाच हजार रूपये व सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
--
उत्कृष्ट संस्था मसाप, डॉ. जर्रा काझी उस्मानाबाद भूषण
उत्कृष्ट सामाजिक कार्य गौरव पुरस्कार देवून मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचा गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते 21 हजार रूपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. उस्मानाबादला अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचा सन्मान मिळवून दिल्याबद्दल तसेच मागील 10 वर्षांत जिल्ह्यातील साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल हा सन्मान देवून गौरव करण्यात आला. प्रसिध्द हास्यव्यंग कवी डॉ. जर्रा काझी यांना मरणोत्तर उस्मानाबाद भूषण पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले. तर वनीता केशव चोबे यांना कृषीभूषण पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.