लोहारा /प्रतिनिधी-
लोहारा शहरातील शिव गणेश मिञ मंडळाच्या वतीने रविवारी गणेश हिप्परगेकर यांच्या व्यंगचित्राचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. हे व्यंगचित्र पहाण्यासाठी नागरीकांची दिवसभर गर्दी होती. शहरातील शिवनगर येथील हनुमान मंदीरात या व्यंगचित्राचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यांचे उदघाटन शिक्षक डी.एम. पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख म्हणुन चित्रकार बाबा मुळे, प्रा.गणेश कांबळे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,गणेश मंडळाचे अध्यक्ष संदीप पाटील, महेश पाटील, सुरज माळी, रघुनाथ पाटील आदी उपस्थित होते.या व्यंगचित्र प्रदर्शनात शंभरपेक्षा जास्त व्यंगचित्राचे प्रदर्शनात मांडण्यात आली होते. यामध्ये पुरपरस्थिती, पाणीटंचाई, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रश्न, लोहारा शहरातील समस्या, वर्तमान राजकारणांवर भाष्य करणारी, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या आणि महाराष्ट्र व देशभरातील बदलत्या राजकीय - सामाजिक घडामोडी दर्शविणारी मराठी भाषा,समाज आणि संस्कृतीसमोरील प्रश्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकत्रितपणे पहिल्यांदाच गणेश हिप्परगेकर यांनी व्यंगचित्र प्रदर्शनातून मांडले. सामान्य माणसाच्या समस्येला वाचा फोडणारे विषय या निमित्ताने नागरीकांना पहायला मिळाले.या प्रदर्शनाच्या माध्यमातुन गणेश हिप्परगेकर यांनी समाजातील विविध प्रश्नांची ही मांडणी केली आहे. हे प्रदर्शन पहाण्यासाठी शहरातील महिला व नागरीक यांनी मोठी गर्दि केली होती.