तुळजापुर/ प्रतिनिधी-
दि.८ सप्टेंबर रोजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे बसवकल्याण (कर्नाटक) दौऱ्यावर जात असताना जळकोट ता.तुळजापूर येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी युवराज संभाजीराजे यांचे जळकोट नगरीत जळकोटवासीयांकडून फटाक्यांची  प्रचंड आतषबाजी करत, वाजतगाजत भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. संभाजीराजे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर छत्रपती संभाजीराजे  यांचा सत्कार प्रशांत नवगिरे यांनी  केला.वतीनेयुवराजांचा सत्कार केला. यावेळी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचे संकट, पशूधनाचे होणारे हाल,वाढती बेरोजगारी आदीबाबत चर्चा करून,जनतेला दिलासा देण्याची मागणी केली. यावर त्यांनी केंद्र व राज्य सरकारशी बोलुन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले.   दरम्यान गडकिल्ले भाडेतत्वावर देण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत नवगिरे यांनी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली असता,याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोललो असून ,शिवरायांचा जाज्वल्य वारसा असलेल्या गडकिल्ल्यांसंदर्भात असा कोणताही निर्णय आपण घेणार नाही.असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे,उपसरपंच कुमार मोरे,दत्तात्रय कदम ,गिरीश नवगिरे यांचेसह गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
Top