उस्मानाबाद/प्रतिनिधी-निविदेअभावी बंद असलेल्या सेतू सुविधेचा फायदा घेऊन निर्धारीत रकमेच्या पाचपट अधिक रक्कम घेऊन प्रमाणपत्र देणा-या शिराढोणच्या आपलं सरकार केंद्रचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून गजाआड केले. ही कारवाई शुक्रवारी (दि.6) करण्यात आली.
तक्रारदार यांच्या लहान भावाचा 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची शासकीय फीस 56 रुपये असताना शिराढोण येथील आपलं सरकार सेवा सुविधा केंद्रामधील राहुल ओमणे याने सदरील प्रमाणपत्राकरीता 300 रुपयांची मागणी केली. यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. उपाधीक्षक रवींद्र थोरात यांनी तक्रारीची शहानिशा करून सदरील केंद्राबाहेर सापळा रचला. यावेळी आरोपी राहुल ओमणे याने तक्रारदार यांना प्रमाणपत्र देण्यापूर्वी त्यांच्याकडून 300 रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारताच पथकाने कारवाई केली.
दरपत्रक लावण्ेा बंधनकारक
दरम्यान, शासकीय सेवा देणा-या आपले सरकार, आधार केंद्र तसेच महा ई सेवा केंद्र आदींनी त्यांच्या सेवांचे दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. तरी ज्या केंद्र चालकांनी दरपत्रक लावले नाहीत त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.