भूम /प्रतिनिधी-शहरातील छत्रपती प्रतिष्ठान वीर गल्ली गणेश मंडळांनी रक्त पुरवठा याचा तुटवडा लक्ष्यात घेऊन रक्तदान शिबिर याचे आयोजन करण्याचे ठरवले.दरम्यान यास प्रतिसाद देत शहरातील मुस्लिम समाजातील महिला व बांधवांनी एक वेगळा आदर्श समाजा पुढे ठेवला आहे.तर या रक्तदान शिबिर मध्ये ज्या व्यक्तींने रक्तदान केले आहे. त्यास चहा , पाणी, केळी बिस्कीट या सोबत प्रमाणपत्र व टिफिन बॉक्स देण्याची व्यवस्था श्री.शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली होती. या रक्त दान शिबिरामध्ये शहरातून 74 रक्तदात्याने रक्त दान केले व यात विशेष बाब म्हणजे दस्तगीर पठाण व तरन्नुम पठाण या मुस्लिम समाजातील दांपत्याने ही रक्तदान केले.दरम्यान या रक्तदान शिबिरामध्ये ज्या रक्तदात्याने रक्तदान केले आहे. यांना कधी ही रक्त बॅगेची गरज पढल्यास शिवशंभू ट्रस्ट च्या वतीने त्यांना महाराष्ट्रात कोठेही विना शुल्क रक्त पुरवठा करण्यात येईल असे शिवशंभू ट्रस्ट चे भूम शहर अध्येक्ष ऋतिक वीर सांगितले.