उस्मानाबाद/प्रतिनिधी-वक्तृत्व ही कला आहे, यासाठी कौशल्य व विद्वत्ता संपादन केली पाहिजे तरच संवाद हा लोकशाहीचा, जीवनाचा आधार होईल. या अंगाला जोपासण्यासाठी चारित्र्यांची जोड लागते. जो वक्ता असतो, तो चारित्र्याची व जीवनाची स्पर्धा जिंकतो, असे औरंगाबाद खंडपीठाचे माजी न्यायामूर्ती बी. एन. देशमुख यांनी बोलताना सांगितले.
झुंजार सेनानी भाई उध्दवराव पाटील जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी अध्यक्षीय भाषणात माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संजय मिस्कीन होते तर भाई धनंजय पाटील, पंडितराव चेडे, मुख्याध्यापक आर. एस. देशमुख, परीक्षक पांडुरंग कंद, प्रा. मारूती घुगे, सचिन पवार आदी उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन भाई उध्दवराव पाटील विचार मंचच्या वतीने करण्यात आले होते. उस्मानाबाद शहरात राज्यस्तरीय वक्तृतव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुंंबई, कोल्हापूर, धुळे, नाशिक आदी जिल्ह्यातून 42 स्पर्धक सहभागी झाले होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा शेतकरी, कष्टकरी आणि श्रमिक आहे, यांच्या प्रशांसाठी उध्दवराव पाटील यांनी संपूर्ण जीवन खर्ची घातले, असे ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्कीन यांनी बोलताना सांगितले. स्पर्धेत 42 स्पर्धकांनी सहभाग घेतला तर परीक्षक म्हणून पांडुरंग कंद, मारूती घुगे, सचिन पवार यांनी काम पाहिले. भाई उध्दवराव विचार मंचच्या सर्व पदाधिका-यांनी पुढाकार घेतला.
पारितोषिक वितरण
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सोलापूरच्या व्ही. जे. शिवदारे महाविद्यालयाच्या ज्ञानेश्वर बंडगर याने प्रथम क्रमांक पटकावला. स्मृती चिन्ह, सन्मानपत्र व अकरा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. अशोकराव महाविद्यालय कोल्हापूरच्या गणेश लोळगे याने 7 हजार रुपयांचे द्वितीय क्रक्रमांक मिळवला. पुण्याच्या आशुतोष निकमने तृतीय क्रमांकाचे 5 हजार रुपये स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र पटकावले. विशेष पारितोषकामध्ये पुण्याचे सुनील काळंगे याने 7 हजार रुपयांचे बक्षित मिळवले. दत्तात्रय चोरमले, इरफान शेख, मोहन कवडे, अश्विनी तांबारे, मिथून माने यांनी उत्तेजनार्थ विशेष पारितोषिक मिळवले.
 
Top