उस्मानाबाद/प्रतिनिधी-
गुरुचे महत्व सांगताना ज्ञानसेवा हीच ईश्वर सेवा असे मानून सर्व शिक्षकांनी आपल्या मातृभूमी व कर्मभूमीवर आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंढे यांनी केले.
दिनांक 5 सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवशी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या गुरुजनांचा सत्कार केला जातो.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षण विभाग,जिल्हा परिषद उस्मानाबाद तर्फे पुष्पक मंगल कार्यालय उस्मानाबाद येथे जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ सन 2018-19 चे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणा-या जिल्ह्यातील 16 शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम नेताजी पाटील, अध्यक्ष जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या अध्यक्षतेखाली व ओमराजे निंबाळकर खासदार उस्मानाबाद, मा.दीपा मुधोळ-मुंडे - जिल्हाधिकारी उस्मानाबाद, डॉ.संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास महेंद्र धुरगुडे, कैलास पाटील, दत्तात्रय देवलकर, संदीप मडके, ज्ञानदेव राजगुरू हे जिल्हा परिषद सदस्य तसेच शिवाजीराव गायकवाड सभापती पं स तुळजापूर, सुधाकर कोकाटे उपसभापती पं स परंडा, सौ.रुपाली घोलप पं स सदस्य वाशी, मनोज सानप जिल्हा माहिती अधिकारी उस्मानाबाद आणि इब्राहीम नदाफ प्राचार्य जिल्हा शैक्षणिक व व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद इ मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना सौ.सविता भोसले शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी सांगितले कि, या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती मा. सौ. अर्चनाताई पाटील यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा संदेश पाठविला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे यासाठी नीती आयोग अंतर्गत निर्देशांकामध्ये सुधारणा करण्यासाठी व शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी सर्व शिक्षकांना आवाहन केले.
मा.नेताजी पाटील यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सत्कारमूर्ती शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी प्रेरणा दिली. जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवडलेल्या शिक्षकांची निवड हि केवळ गुणवत्तेनुसार करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर मा.ओमराजे निंबाळकर खासदार जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी शिक्षकांना उद्देशून बोलताना ग्रामीण भागातील शेतमजूर,शेतकरी यांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा हा इंग्रजी माध्यमातील शाळांपेक्षा चांगला असल्याचे सर्व श्रेय त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना दिले.तसे असूनही ग्रामीण भागातील काही पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे अधिक असल्याबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केले.
यानंतर मा.मा.डॉ.संजय कोलते,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी शिक्षकांना उद्देशून बोलताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे व शिक्षकांनी आपल्या कार्यक्षमतेचा विकास करून विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा परीक्षाना अनुसरून पूर्वतयारी, वैज्ञानिक दृष्टीकोन, मूल्यशिक्षण आणि क्रक्रीडाविषयक खेळ इ बाबींवर विशेष भर देवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत तसेच स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत सन 2019 हे अॅप डाऊनलोड करून आपला व ग्रामस्थांचा प्रतिसाद नोंदवण्यासाठी आवाहन केले.
तसेच महेंद्र धुरगुडे जिल्हा परिषद सदस्य यांनीही शिक्षकांना उद्देशून मार्गदर्शन केले. सत्कारमूर्ती शिक्षकांमध्ये श्री.बाभळे अमोल प्रा शा हसेगाव केज ता कळंब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण अभियानात जिल्ह्याने राष्ट्रीय स्तरावर मानांकन प्राप्त केल्याबद्दल जिल्हाधिकारी महोदया आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा ओमराजे निंबाळकर खासदार यांनी सत्कार केला. या सत्कार सोहळ्यात पर्यावरण संतुलनासाठी स्तुत्य उपक्रम म्हणून कापडी पिशव्यांचे वाटप शहरातील जिल्हा परिषदेच्या दोन प्रशालांना करण्यात आले. तसेच विविध फळांच्या संकलित केलेल्या बिया मा.जिल्हाधिकारी महोदया यांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुपूर्द केल्या. हेलिकॉप्टर मधून बियांची उधळण करणे या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी श्री.सुत्रावे विद्यानंद किसनराव प्रशाला नंदगाव ता. तुळजापूर या सत्कारमूर्ती शिक्षकाची चि_ी काढून निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री गजानन सुसर, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी केले. तसेच सूत्रसंचालन हनुमंत पडवळ प्राथमिक शिक्षक जि.प. प्रा.शा. शेलगाव (ज.) तालुका कळंब यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.