उस्मानाबाद/प्रतिनिधी-
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात, आज ५सप्टेंबर शिक्षक दिनी. माजी राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी त्यांच्या प्रतिमाचे पूजन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रभारी प्राचार्य प्रा.डाॅ.ए.बी.इंदलकर ,प्रा.बबन सुर्यवंशी उपस्थित होते.
यावेळी प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर यांनी डाॅ.राधाकृष्णन यांचे जीवन व कार्य या विषयावर आपले विचार मांडले.यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांना गुलाब फुले देऊन शुभेच्छा दिल्या.
 
Top