लोहारा/प्रतिनिधी-लोहारा तालुक्यातील आरणी येथील एकता तरुण गणेश मंडळाच्यावतीने गेली 20 वर्षापासुन एक गाव एक गणपती ची स्थापना करुन विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. एकता तरुण गणेश मंडळाच्यावतीने सामाजिक बांधीलकी जपत रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. यामधे सरपंच शंकर गिरी व उपसरपंच सौ.बालिका उमाकांत दरेकर व महत्त्वाचे विशेष म्हणजे गावातील 58 वर्षीय विजयकुमार रामराव किणीकर यांनी रक्तदान केले. यामध्ये 30 जणांनी रक्तदान केले. या रक्ताचे संकलन उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीचे कर्मचारी
गणेश साळुंके, महिपाल खाडप, भोजने मामा, अदिंनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.