उस्मानाबाद/प्रतिनिधी-शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील धनेश्वरी शिक्षण समूहाने शिक्षणरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवले होते त्याला चांगला प्रतिसाद मिळाला व १८२ प्रस्ताव प्राप्त झाले होते त्याची छाननी प्राचार्य डॉ.कैलास मोटे,प्राचार्य सुरज ननवरे,प्राचार्य महेश शिंदे प्राचार्य संतोष भांडवलकर,प्राचार्य अमर कवडे, प्रा.तुषार वाघमारे,प्रा.अर्शद शेख,हरि घाडगे,दत्तात्रय घावटे यांनी केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील  शिक्षण, क्रीडा,संगणक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या २० शिक्षकांना शिक्षकदिनाचे औचित्य साधून पुरस्कार जाहीर केले आहेत.या पुरस्काराचे वितरण उस्मानाबाद येथे दि.११ सप्टेंबर रोजी सकाळी ११-०० वाजता करण्यात येणार आहे.
   धनेश्वरी शिक्षण समूह महाराष्ट्र, छत्तीसगड यांनी घोषित केलेले जिल्हास्तरीय शिक्षकरत्न प्राप्त पुरस्कार शिक्षक पुढीलप्रमाणे
वरिष्ठ स्तरातून डॉ.दिपक सुर्यवंशी(शि.म.ज्ञानदेव मोहेकर,कळंब),डॉ.शिला स्वामी (माधवराव पाटील महा.मुरुम),प्रशांत भागवत(श्री.कुलस्वामिनी उच्च मा.विद्यालय तुळजापूर)कल्लय्या रुद्रय्या स्वामी(श्रीकृष्ण उ.मा.विद्यालय,गुंजोटी),माध्यमिक स्तरातून चंद्रकांत तांबे(गुरुदेवदत्त हायस्कूल भूम),विक्रम सांडसे व शेषनाथ वाघ (श्रीपतराव भोसले मा.व उ.मा.विद्यालय,उस्मानाबाद),दिपक सोनवणे(जि.प.प्रशाला आरळी.बु.), प्राथमिक स्तरातून बाळासाहेब जमाले(जि.प.कें.शाळा,कसबे तडवळे),प्रशांत जाधवर (जि.प.प्रा.शाळा दसमेगाव ता.वाशी), सुषमा श्रीकांत मसे (जि.प.प्रा.शाळा.बाभळगाव ता.कळंब),रमेश अंबिरकर(संत बोधले महाराज प्रा.शाळा.डिकसळ ता.कळंब) शरद बबन नवले (जि.प.प्रा.शाळा. खानापूर ता.परंडा),मंजुषा स्वामी(जि.प.प्रा.शाळा किणी ता.उस्मानाबाद)विशेष पुरस्कार आश्रुबा कोठावळे(संत माऊली ज्ञानेश्वर मुकबधीर विद्यालय,कळंब)भगवान चौगुले(श्री स्वामी समर्थ मुकबधिर निवासी विद्यालय,उस्मानाबाद),मनोज पवार(क्रीडा)अतुल महाजन(संगणक) कार्यासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.तर दिलीप चौधरी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यांबद्दल त्यांना विशेष सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे माजी कुलगुरु डॉ.वेदप्रकाश पाटील,आमदार डॉ.राहुल पाटील, धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील व उपाध्यक्ष डॉ.उदयसिंह पाटील  यांनी अभिनंदन करुन शिक्षक दिनाच्या शूभेच्छा दिल्या आहेत.

 
Top