उस्मानाबाद/प्रतिनिधी- अप्रमाणित व विनापरवाना उत्पादीत खत विक्री करून शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी (दि.४) शिराढोण येथील महावीर कृषी सेवा केंद्राविरुध्द गुन्हा दाखल झाला.
खत निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक चेतन जाधव यांनी २९ मे रोजी कळंब तालुक्यातील शिराढोण येथील महाविर कृषी सेवा केंद्रास भेट देऊन तपासणी केली होती. यावेळी दुकानात 'राज फर्टीलायझर ॲण्ड केमिकल्स' एमआयडीसी कुपवाड सांगली या कंपनीद्वारे विनापरवाना उत्पादीत, अप्रमाणित तसेच अत्यावश्यक मजकूर (परवाना क्रमांक) इत्यादी खत पिशव्यांवर छापला नसलेल्या, खतातील घटक व्यवस्थितपणे नमूद केला नसलेल्या ४०० पिशव्या खत (किंमत २,२०,०००) आढळले. याप्रकरणी संबंधीत उत्पादक कंपनी व दुकानदारावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
Top