उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्हास्तरीय तायक्वाँदो क्रक्रीडा स्पर्धेचे अखिल भारतीय खो-खो महासंघाचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव यांच्या हस्ते बुधवारी (दि.4) उद्घाटन करण्यात आले. जिल्हा क्रक्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा तायक्वाँदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धेत 14 व 17 वयोगटातील 150 खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
उस्मानाबाद शहरातील तुळजाभवानी क्रक्रीडा संकुलवर ही स्पर्धा घेण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा मीडिया विभागाचे जिल्हाप्रमुख तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे तर जिल्हा क्रक्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, क्रक्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, तालुका क्रक्रीडा अधिकारी सारिका काळे, वरिष्ठ लेखा पालिका अधिकारी धोंडरीकर, सहाय्यक लेखा पालिका अधिकारी राजीव पाटील, तायक्वाँदो असोसिएशनचे सचिव राजेश महाजन, प्रशिक्षक राम दराडे,  शाहरुख सय्यद, असिफ सय्यद आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रक्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले तर आभार प्रशिक्षक एकनाथ सुतार यांनी मानले.

 
Top