उस्मानाबाद/प्रतिनिधी-संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांनी शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांना सर्व सहकार्य केले.प्रसंगी संस्थेच्या शाळा चालवण्यासाठी सुरवातीला त्यांनी गळ्यातील मंगळसूञही विकून त्यांना पैशे दिले.त्या त्यागातूनच आज, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचा आज अफाट विस्तार झाला आहे. असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,उस्मानाबाद येथे आज ४सप्टेंबर संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या ९३वी जयंती साजरी करतांना प्रा.डी.एम.शिंदे (समाजशास्ञ विभाग प्रमुख)यांनी केले आहे.
प्रारंभी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख,५३महाराषट्र बटालियन एन.सी.सी.लातूरचे कमांडिंग आॅफिसर कर्नल सुनिल अब्राहम,सुभेदार मेजर दिपक मुकाम,सुभेदार औंदुंबर शिंदे,डाॅ.बापूजी साळुंखे लाॅ.काॅलेजचे माजी प्राचार्य डाॅ.चौधरी,प्रभारी प्राचार्य डाॅ.ए.बी.इंदलकर,प्रभारी प्राचार्य प्रा.बबन सुर्यवंशी यांनी डाॅ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमांचे पूजन केले.
पुढे बोलतांना प्रा.शिंदे म्हणाले की, आज आपण ज्ञानदान करतांना संस्थामातांचे विचार आठवावेत ,त्यांचे कार्य आठवावे ,आणि त्यांचे धगधगते आयुष्यआठवावे त्यांचा त्याग आजहीआपणासाठी प्रेरणा आहे.
यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक आणि विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूञसंचालन व आभार प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर यांनी मानले.
 
Top