लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा हायस्कुल शाळेच्या प्रांगणात फिट इंडिया मुव्हमेंट या केंद्र शासनाच्या मोहीम अंतर्गत बँडमिटन, व्हॉलीबॉल, खो— खो, कब्बडी, या क्रिडा स्पर्धेचे उदघाटन भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सुधाकर पांचाळ होते. तर प्रमुख म्हणुन भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, पालक प्रतिनिधी कल्याण ढगे, अदि उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी व क्रिडा प्रमुख गोपाळ सुतार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशालेतील विद्यार्थीनी तबसुम शेख, वसुधा साबळे व विद्यार्थी संकेत माळी, अदिंनी तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत यश संपदान केल्याने यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रशाळेच्यावतीने विद्यार्थी व विद्यार्थ्यीनीसाठी वर्षभर खेळण्यासाठी सुसज्ज मैदान तयार करुन खेळाचे साहित्य देण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रिडा प्रमुख गोपाळ सुतार यांनी केले. तर आभार शिक्षक दयानंद पोतदार यांनी मानले. या कार्यक्रमास बाळासाहेब लांडगे, वैजिनाथ पाटील, विठ्ठल वचने पाटील, सतिश जट्टे, विजय नागणे, प्रज्ञ्मुन देवकर, वैजिनाथ होळकुंदे, दिलीप शिंदे, सदाशिव बचाटे, शाम पोतदार, सुरेश पांचाळ, शिल्पा साबणे, निर्मला कोळी, शिल्पा साबणे, स्वाती माशाळकर, विद्या मक्तेदार, यांच्यासह शिक्षक, विद्यार्थीनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top